माथेरानला बऱ्याचवेळा जाऊन सुद्धा जवळच्या पेबला जायचा काही योग येत नव्हता. बाबा २ वेळा जाऊन आले होते आणि मी काही फोटोही पाहिले होते. त्यावरून गड सर करायला चांगलीच मजा येईल (आणि घामसुद्धा) हे जाणून होतो. मग एका गुरुवारी संध्याकाळी पेबचा "plan" ऐकला आणि डोक्यात नवीन ट्रेकचे वारे वाहू लागले. हळू हळू शनिवार पर्यंत १० भिडू गोळा केले आणि बाबांच्या "community" बरोबर जायचे ठरवले.
दुसर्यादिवशी ट्रेक असला की आदल्या रात्री काही डोळ्याला डोळा लागत नाही. साडे चारचा गजर लाउनही ३ ला एकदा आणि परत ३:३० ला उठलोच. शेवटी झोप काही लागत नाही म्हणून उठलो. सगळी तयारी केली आणि ५:४५ ला घरातून कूच केली.कळव्याला जाऊन सकाळी ६:१८ ची ट्रेन पकडली आणि ट्रेन मध्ये एकाच गोंधळ चालू असल्याचे समजले.ट्रेनमध्ये दरवाज्यात उभं राहून पहाटेच्या गारव्याचा आनद घेतला. तेज, निनाद, राहुल मिळून गप्पा हाकत होतो. नेरळला पोहोचलो आणि कळला की एकूण २१ जण आहोत!
नेरळ वरून चालत पायथ्याला पोहोचलो आणि "introduction" आटपून घेतलं. उन्हं येत होती आणि स्वेंटर,शाली, कानटोप्या अंगावरून निघत होत्या. समोर पेबचा कडा दिसत होता तर दावीकडे माथेरान. समोर रस्त्यात बरीच गाव होती.चालत असताना मी राहुल आणि निनाद थोडं पुढे निघालो. रस्ता चुकलो!! पण जे होतं ते चांग्ल्य्साठी होतं.चालत असताना समोरून एक मध्यम आकाराचा पक्षी उडत गेला.त्याचा मागोसा घेतला तेव्हा कळलं की तो भारद्वाज होतं ! माझा मित्र प्रसाद डिंगणकर जो नेहमी हा पक्षी बघण्यासाठी उत्सुक असतो,कावळ्याचा आवाजही त्याला भारद्वाजचा वाटतो! पण नेमका या वेळी तोः आमच्या सोबत नव्हता.तो होता राजमाचीला.त्याची कमी जाणवली म्हणूनच कदाचित हा भारद्वाज आम्हास भेट देऊन गेला.असो,रस्त्याचा अंदाजे काढत आम्ही गडाच्या उजव्या बाजूला जात राहिलो. गडाला चिकटून असलेला डोंगर चढलो आणि त्याच्या दुसर्या बाजूने उतरून गडावर चढायचे होते.ही चढण चांगलीच दमछाक करणारी होती.
सुकलेलं गावात आणि सुकलेली माती चढणं कठीण करत होती.पडत लोळत सगळे एकदाचे पोहोचले त्या टेकाडावर. समोर एक भलामोठा विद्युतखांब होता. चढल्यावर त्याशेजारी डाव्याबाजूला गर्द झाडी होती. त्या झादीच्या उंबरठ्यावर असलेल्या सावलीत आम्ही विसावलो. चिवडा फरसाण खाल्लं आणि परत वात पकडली. आता ठरवला की थांबायचं ते सरळ गडावर पोहोचूनच.
उन्हं तापू लागली होती पण हवेत गारवा होता न डोक्यावर सावली. वात सुखद होती जास्त चढही नव्हता. गप्पा मारत जंगलाची मजा लुटत आमचं टोळकं चालत होतं. जसजसं जंगल वाढत होतं तसाच पाया खालचा गावातही वाढत होतं. पायाला खूप खाज येत होती. याची सोय तर पुढे होती. काहीवेळाने आम्ही त्या झाडीतून बाहेर आलो आणि गडावर चढणं सुरु झालं.वाटेत एक मोठा झाड दिसला. त्याच्या डोहात ३-४ जण आरामात राहतील इतकी जागा होती.
या गडाला बिकटगड का म्हणतात ते आम्हाला चांगलंच कळत होतं.पहिलाच चढ छातीवर घेऊन आम्ही कुठे थोडा वर पोहोचतोय तोवर एक सुकलेला ओढा खाली आलेला दिसत होतं. त्या ओढ्याबरोबरच वर चढायचे ठरले. हि वात मगासच्या वाटेच्या बरोब्बर उलट होती. चढण होतं आणि डोक्यावर सावलीही नव्हती.ओढ्यातील दगडांवर चालणं फार कठीण जात होतं. पाय सटकला तर मुरगळण्याची शक्यता खूप असते. प्रत्येक पाउल जपून ठेवावा लागत होतं.हे सगळा असा चालू असताना पहिल्यांदा ट्रेकवर आलेल्या रश्मीला एक "चांगलाच" अनुभव आला. नेमकी इथे तिचे दोन्ही बूट फाटायला लागले. जवळ जवळ फाटलेच. मग ते बांधायला सगळे धागे-दोरे शोधात होते. मग ते बूट त्याने बांधले गेले. हे सगळा सावरत सावरत ती चढत होती. आमचा वेग बराच थंडावला होतं. याला पूर्णतः कारणीभूत होते ते सूर्यदेव. घामाच्या धारा वाहत होत्या. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत होत्या. लिमलेटच्या गोळ्या फस्त होत होत्या.वाटेच्या दोन्हीबाजूने काटेरी झुडुपं होती.पोट्रीची सगळी चामडी उर्ख्द्याने निघत होती. पण काही करता येत नव्हता. आता पाय डोक्यावरतर नाही घेऊ शकतना आणि जरी घेतले तरी तीच दशा हातांची होणार हे नक्की.थकून भागून ओरखडे झेलून नाखीण आणि पेबच्या बेचक्यात पोहोचलो.
इथे सोसाट्याचा वारा वाहत होता. वारा खाऊन फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.चढ कमी झाला होता. ही वाट कडेकडेने जात असल्यामुळे सावधतेने आम्ही जात होतो. बाबा एकटेच पुढे जाऊन उंच गवतात दिसेनाशे झाले होते. काही वेळाने एका वळणावर जुनी गाणी ऐकू येत होती. वळून बघितला तर तिथे एक भल्यामोठ्या दगडावर बाबा शांत गाणी ऐकत आमची वाट बघत बसले होते! त्यांनी आम्हाला न थांबता पुढे जायला सांगितला.पुढे लागणार होता एक छोटुसा "rockpatch".
इथपर्यंत पोहोचलो तेव्हा माझ्याबरोबर तेज आणि अभिषेक होते.समोर एक चांगला १५-२० फुटांचा "rockpatch" होता.गळ्यातला camera आत टाकला आणि पाहणी करायला निघालो. पारसिकवर केलेल्या "rockpatch" ची आठवण येत होती.हा भाग सर करून वर पहिली sack ठेवली. पाठोपाट लगेच तेजही आला. त्याला वर बसउन मी परत खाली आलो. मानली, निनाद, राहुल, संकेत, रश्मी, अंकिता, बाबा, बने काका सगळे आले होते. जेवढी लोक होती सगळ्यांच्या bags अगोदर वर पोहोचवल्या. मग हळू हळू एक एक करून सगळे वर पोहोचले. पण अजूनही पाठी बरीच लोक राहिली होती. ते सगळे येईपर्यंत आम्ह्चा photosession चालू होता.त्या लोकांना यायला अजून २० मिनिटे गेली. मग बाकीचेही वर पोहोचले. इथे एक छोटासा problem झाला. इथे दगडांमध्ये एक बारीकशी जागा आहे. इथून वर जावे लागत होते.आमच्यातल्या अनिरुद्धची इथे थोडी पंचाईत झाली झाली. भरभक्कम देहयष्टीचा असल्याकारणे त्याला हा भाग थोडा कठीण जात होता. जागा कमी असल्याने त्याला वर खेचून घेणंही कठीण जात होतं.त्याला भीती होती ती परत खाली येताना कसा येणार याची. अश्यावेळी जेव्हा त्याला सगळ्यांची गरज होती तेव्हा सगळे एका मोठ्या कुटुंबासारखे त्याच्या पाठीशी उभे होते.तेज आणि नितीन बने काका वर बसून त्याला कुठे पकडायचे, कसे पकडायचे ते सांगत होते. खालून मी व त्याचे वडील त्याला दिलासा देत होतो."घाबरू नकोस रे", "अर्रे दोन पावला टाक आणि वर आलास म्हणून समाज", "common dude you can do it" असे आवाज येत होते. हीच खरी जादु असते ट्रेकची. याला मी आणि माझ्यासारखे बरीच लोकं आज पहिल्यांदाच भेटलो होतो.फार काही बोलणही झालं नव्हता. तरी पण त्याच्या पाठीशी सगळे उभे उभे. एका दिवसात जन्मा जम्नाची नाती असल्यासारखे वागणारे लोकं म्हणजे "trekkers". कुल, जात, धार्म, प्रतिष्ठा, मान, नाव, गाव अश्या सगळ्या गोष्टी विसरून एका तटावर जेवायला बसणारे म्हणजे "trekkers". तर असाच सगळा "moral support" देऊन त्यालाही वर घेतलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचा वर सावागत झालं. उरलेले एक दोन जनही वर आले आणि आम्ही वर गुहेच्या दिशेने निघालो.
अजून ५-१० मिनिटांमध्ये गुहेत पोहोचलो.
इथून समोर म्हसमाळ डोंगर दिसत होतं.लांब धुक्यात मालान्गड आणि चंदेरी सुद्धा साद घालत होते. हे दृश्य मनोमन पाहून थोडे विसावलो. काही फोटो काढले आणि डबे उघडले. पुलाव, इडली, पोहे, ठेपले, चपात्या, ब्रेंड, मसाले भात,अंडी, लसून चटणी, "garlic rice",आणि विविध प्रकारची लोणची अशी मेजवानी मांडली होती.हे जेवण स्वाहा केलं.गडाची माहितीचे "printouts" तेजने सगळ्यांना वाचून दाखवले.
शांतपणे ऐकलं आणि आम्ही पुढे गड पाहायला निघालो.
वाटेत एक छोटासा भुयार दिसलं.आत जायला गुड्घ्य्वर बसून एकावेळी एकाच माणूस आत जाऊ शकेल इतकी जागा होती. mobile मधला torch घेऊन काही वीर अगोदर आत शिरले.आत काही ण दिसल्याने परत बाहेर आले. आता पर्यंत दुसऱ्यान मध्येही उत्सुकता निर्माण झाली होती आत जायची. या वेल्स दुसरे काही लोक आत गेले. हे सगळा चालू असलेला पाहून मी ही जायचा ठरवला. थोडा आत गेलो. श्वास कोंडल्या सारखा वाटत होतं.म्हणून परत बाहेर आलो. पण अंगातली मस्ती काही कमी होई ना.म्हणून परत गेलो. या वेळेस मी साल्यात पुढे होतो हातात torch घेऊन.माझ्यापाठी मानली व टोच्या पाठी तेज असे ३ जन आत गेलो. १० -१५ फूट रांगत गेल्यावर खाली एक चौकोनी खड्डा आहे. torch नसेल तर आत नाकी पडणार. torch च्या उजेडात खाली उडी मारली. पुढे अजून ४-५ फूट रंगत गेलो आणि पाहिलं तर एक छोटीशी खोली होती. आतून चुना मारल्याचे काळात होते.लोखंडी पिंजर्याला असतो तसा दरवाजा होतां. आत torch मारला काही दिसेना मग पाठी फिरलो. आता मानली आत उतरली होती. ती देखील torch घेऊन पुढे बघून आली. मग तिला अगोदर वर चढायला मदत केली. आणि मग स्वतः "chimney climbing" करत बाहेर आलो.
पुढे शिडी वापरून थोडा वर चढायचा होत.वर चढून गेलो आणि एक कोपर्यात हनुमानाची कोरलेली प्रतिमा होती.त्याला वंदन केले आणि पुढे सरकलो. वात थोडी कठीण होती. सावधपणे चढून डोंगराच्या कडेशी पोहोचलो.इथे रस्ता कुठे जातोय हे काही कळेना.हेमंत काकांनी काही पायर्या दाखवल्या आणि त्यावरून आम्ही वर चढलो. काटेरी झुडुपं अंग सोलून काढत होती. त्यामधून चालत-चालत चढत-चढत वर मंदिरा पर्यंत पोहोचलो. मंदिराचा सुशोभीकरण चालू होता. इथे थोडावेळ विसावलो आणि गडाच्या टोकाच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यात रानफुलांची रास लागली होती. टोकाला अतिशय वाईट परिस्थितीत असलेली एक भिंत होती. त्यावर चढून बघितला. समोर माथेरान दिसत होते. आश्चर्य असं की आम्हाला माथेरानची "mini train" सुद्धा दिसली. समोर उंच "panorama" पोइन्त्च टोक होता. त्यापाठी प्रबळगडाची आकृती दिसत होती. एक बारीकशी पायवाट आम्ही जिथे बसलो होतो तिथून निघून पुढे माथेरानच्या कड्या पर्यंत जात होती. ती वाट पाहून अंगावर काटा येत होता.इथे काही फोटो काढले आणि माघारी फिरलो. परतीच्या वाटेत अजून काही लोक तिथे जात होते. आम्ही विचार करत होतो की आलेल्या वाटेने परत जाणे कठीण होते. या माथेरानच्या वाटेने गेलो तर ? असे विईचार चालू होते.ही वाट अत्यंत भयानक वाटत होती. एवढा ओझा घेऊन जाण फार फार कठीण झाला असत. शेवटी ठरलं की आलेल्या वाटेने गेलेलं बऱ. वरच्या मंदिरात पाणी प्यायलो आणि गुहेची वाट धरली. गुहे कडे पोहोचलो तेव्हा सगळ्यांची आवर आवर चालू होती. बरीच माकडं आली होती. त्यांचे काही फोटो लढले आणि आलेल्या वाटेने परत फिरलो.
"rockpatch" या वेळेस आरामात उतरलो. इथे तेजला युक्ती सुचली. रश्मी तिच्या तुटलेल्या "woodland" मुळे हैराण झाली होती. तिचे "socks" बाहेर आणि "woodland" आत अशी शक्कल लढून तिला ते बूट घालण्यात आले. बाकीचा ट्रेक तिने "तसाच" पार केला.पायथ्याला पोहोचल्यावर एक छोटे खाणी सत्कार सोहोळा करण्यात आला.



नवे "trekkers" आणि अत्यंत जिद्दीने चढलेल्या सूर्यवंशी परिवारचा सत्कार करण्यात आला.
माझ्या आयुशात्ला १९ वा ट्रेक अश्या रीतीने पार पडला.
No comments:
Post a Comment