It’s a man’s nature to go out and Climb Mountains, sail the seas and touch the deepest oceans and challenge the nature. By trying to do these things we touch something out side ourselves, and reveal in the illusion that we are the masters of our world. But everyone one of us should never forget that even if we climb the tallest mountains and travel the deepest oceans we are still dwarfed by the nature and its forces.


GUTS AND GLORY

Friday, June 10, 2011

२०११ सालचा पहिला ट्रेक ..... अर्थातच ......पारसिक !

सालाबाद प्रमाणे यंदाच्या मौसामातला पहिला ट्रेक म्हटला की जे नाव माझ्या आपसूक मनात येत ते म्हणजे पारसिक. या वेळी म्हटलं थोडं काहीतरी वेगळं करू. यंदाचा बेत ठरला पर्सिक्वर असणाऱ्या " nursery rock " वर जाण्याचा. पण मुहूर्त काही मिळेना. मग एकदम अचानक ९ तारखेला रात्री ९ वाजता आमचे प्रिय मित्र श्री प्रसादराजे डिगणकर यांचा फोने आला . आता तुम्ही विचाराल की हे प्रसादराजे कोण ? कधी आले ? कुठून आले ? तर. हे राजे अश्यासाठी की वेळ, काळ, हे असं काही यांना माहीतच नाही. असो. याबद्दल नंतर बोलू. तर प्रसादचा फोने आल्यावर त्याने मला विचारला की " अर्रे उद्या काय करतो आहेस ? nursery ला जायचा का ?". पार्सिकला जायला कारण लागत नाही. आपोआपच उत्तर हो असं आलं माझ्याकडून. मग काही फोने इथे काही फोने तिथे. काही message इथे काही तिथे. हा ट्रेकिंगचा नेहेमीचा सोपास्कार पूर्ण झाला. काही हो आले तर काही नाही आले. मित्र अनेक त्यांची कारणं अनेक. काही तर थेट जाऊन बसले होते दिल्लमध्ये. मग शेवटी उरले फक्त ३. मी, प्रसाद आणि चिन्मय रासकर.
सकाळी ६:३० वाजता १० तारखेला झोपेतून उठलो ते फोनेची रिंग ऐकून. फोनेवर होते प्रसाद्राजे. त्यांनी विचारणा केली की " अरे तिथे पाऊस पडतोय का ? ". अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी खिडकी बाहेर पाहिला आणि म्हणालो " जरा ही नाही पडत आहे." राजे म्हणाले ठीक आहे मग मी निघतो इकडून. घरातून निघालो की तुला फोने करीन. ठीक आहे म्हणून मी पुन्हा झोपी गेलो! ६:४६ ला परत फोने वाजला. मी हैराण होऊन उठलो की एवढ्या लगेच राजे निघाले कसे ? बघतोय तर फोने चीन्मयचा होता. दचकून उठलो आणि फोने उचलला. चीनमय म्हणतो " मी घरातून निघालो आहे. बस स्टोप वर भेटू." आता माझी धाव पळ सुरु झाली. प्रातःकालीन विधी आटपून मी BAG शोधायला सुरुवात केली ! बघतो तर काय BAG गायब ! अजून वेळ न दवडता कॉलेजची sack घेतली आणि त्यामध्ये कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या आणि एक नशिबाने हाताला जवळच मिळालेला raincoat भरला आणि धाव घेतली. घरातून निघालो ते मेथीचा लाडू तोंडात कोंबून आणि एका हातात पाण्याची बाटली घेऊन. बस स्टोप वर घड्याळ बघितला तर ते सांगत होता ७:०५.
बस स्टोप वर आल्यावर प्रसादला फोने केला. त्याने सांगितला की तो घरातून निघतोय म्हणून. एवढ्यात बस आली. आम्ही बस मध्ये चढलो आणि काही जुन्या ट्रेकच्या आठवणीत रमलो. ७:२५ च्या आसपास आम्ही मुंब्रा देवीच्या पायथ्याशी होतो. इथे मी सांगतो की मी प्रसाद " राजे " का म्हणतो आहे ते. इथे आल्यावर राज्यांना फोने केल्यावर आम्हास असे आढळून आले की राजे त्यांच्या इमारतीच्या पायऱ्या उतरत आहेत ! राजे आम्हास म्हणतात कसे, " अरे बघ फक्त ७ मिनिटं लागतात तिथपर्यंत यायला". पण ७ मिनिटं लागतात ठाणा स्टेशन वरून मुंब्रा स्टेशन ला आणि हे अजून पायऱ्या उतरत आहेत. IST अर्थात INDIAN STANDARD TIME या गोष्टीचा खरा वापर याचं अजून चांगला उदाहरण नाही देता येणार. मग काहीवेळ तिथे वाट पहिली. मग काही वेळ पायऱ्या चढून गेल्यावर छोटं मंदिर लागतं तिथे वाट पहिली. मग जी जायची वाट होती त्या वाटेच्या तोंडाशी जाऊन राज्यांची वाट पाहिली. पण राजे काही येत नाहीत. इतक्यात पाउस सुरु झाला. ही आली पंचाईत. या पावसात प्रस्तरआरोहण करायचं म्हणजे चांगलीच दमछाक होणार हे ठरलेलं. मग काय फोने करा. पण राजे फोने उचलतील तर शप्पथ. मग कुठे एक आशेचा किरण ऐकू येऊ लागला. राजे फोनेवर म्हणतात की आम्ही मुंब्रा देवीच्या पायऱ्या चढतो आहोत ! आणखी ५ मिनिटांनी एक छोटेखानी आकृती पायऱ्या चढताना दिसू लागली. पाऊस पडत असूनही डोक्यावर न छत्री होती न शरीरावर raincoat. पाठीवर sack अडकवलेली. हे आले आमचे राजे ! राज्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्यावर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो.
nursery मध्ये पोहोचलो. sack बाजूला ठेऊन पहिला try केला मग दुसरा मग तिसरा . काही झाले पण हाताला काही ग्रीप मिळत नव्हतं. थोडे कठीण करणे अजिबात शक्य होत नव्हतं. एवढ्यात पावसानेही जोर पकडला. काळे ढग ओसरण्याची काही चिंन्हे दिसत नव्हती. मग एका OVERHANG खाली बसलो आणि पूस जाण्याची वाट पाहू लागलो. इतक्यात राज्यांचा सल्ला आला. पारसिकच्या डोंगर माथ्यावर जाऊ. मी अगोदर तय्यार नव्हतो. चीन्मायही तय्यार नव्हता. ९ वाजून गेले होते. १२:३० पर्यंत खाली उतरायचा होता. हे शक्यच नाही असं वाटत होतं. पण राज्यांना नाही अकायची सवय नाही. मग काय ९:२० ला निघालो आणि परतीची वाट पकडली. रिक्षाने कळव्याला परत आलो आणि झोपडपट्टीतून चादायला सुरुवात केली.
पार्सिक्ची अजून एक खासियत आहे. कुठ्च्याची दिशेने चढलात तरी सुरुवातीला हागणदारी लागायलाच हवी. मग आम्ही कसे वाचू शकू. नेहमीच्या घळीत आलो आणि श्वास घेतला. इतका सुवास सहन होत नव्हता. मग काही वेळात चढायला सुरुवात केली. मी पुढे होतो चीनमय मध्ये आणि राजे शेवटी.पाऊस रिमझिमत होता. माती ओली झाली होती. पाय स्थिरावत नव्हते. पण सोपा असेल तर तो पारसिक कसला. वाट काढत, खाच खळग्यात अडखळत, पडत झडत, हसत आणि हसवत, मध्ये मध्ये शिव्या ओव्या पुटपुटत आम्ही वर पोहोचलो. वरून जे दृश्य दिसतं ते नेहमीच वेगळं असतं. कधी उन्हाचा रख रखीतपणा तर कधी अंगावर येणारे ढग. कधी गार गार वारा तर कधी बोचणारा पाउस. तिथे त्या बोर्डांच्या खाली थोडं स्थिरावलो आणि मग परत चालू लागलो दुसर्या डोंगरांकडे. तो डोंगर काहीसा उतरून ओढ्याच्या दिशेने चालू लागलो. ओढ्याजवळ बरेच खेकडे दिसत होते. पण ओढ्यात पाणी अजिबात नव्हतं. ओढा पार केला आणि त्या बाजूला गेलो. वाट चांगली होती. एक बाजूला दरी दिसत होती तर दुसर्या बाजूला पाउसात न्हाऊन निघालेला कातळ. पाऊसही कमी झाला होता पण अजून पूर्ण पणे गेला नव्हता. आम्ही तिघे गप्पा मारत चालत होतो. पुद्धे गेल्यावर रस्ता चढणीला लागत होता. १०:५२ झाले होते. ११ च्या आता सुळक्या खाली नसतो पोहोचलो तर उशीर झाला असता. पण घाई करण्यात अर्थ नव्हता. माती सुटी होती आणि पाय घसरत होता. SANDAL घालून चढणं जमत नव्हतं. पाय मुरगळण्याची भीती होती. SANDAL हातात घेऊन चालू लागलो.आश्चर्याने सुळक्याच्या पायथ्याला पोहोचलो तेव्हा वेळ झाली होती १०:५९. बरोबर वेळेत पोहोचून आम्ही आमच्या BAGS एका दगडा खाली ठेवल्या. TIGER बिस्कीट खाल्ली आणि वर निघालो. पाऊस थांबला होता. थोडं उन पडू लागलं होतं. आम्ही वर चाढलो तिकडून दृश्य अप्रतिम होता. लांबवर पाउस पडत होता ते दिसत होतं. दुसर्या बाजूला थोडं फार उन होतं. तिथे ११:३० पर्यंत थांबलो आणि परतीची वाट धरली.
घळीतून येणारी वाट ही वर येताना सगळ्यात सोयीस्कर आणि सोपी आहे. पण याच वाटेने मी आज्तागत कधी खाली उतरलो नव्हतो. प्रसादच्या जबरदस्तीने ती वाट उतरू लागलो. पहिले १५-२० फुट हे पूर्ण पणे ओल्या चिकट मातीचे आहेत. त्यामुळे तिथून उतरणं फार अवघड जात होतं. मातीतून बाहेर आलेलं कुठल्यातरी झाडाचं मूळ पकडून आम्ही खाली उतरत होतो. हात मातीने माकले होते. कपड्यांवर चिखल होता. अश्या अवस्थेत आम्ही उतरत होतो. प्रसादने कुठची तरी वेगळीच वाट शोधली होती. आम्ही हा मातीचा भाग उतरलो तरी सुद्धा राजे वेगळाच रस्ता शोधात होते. राजे उतरेपर्यंत मी आणि चीनमय पायला लागलेली माती काढत होतो. मग रजेच पुढे झाले आणि रस्ता काढू लागले. चांगलंच कडकडीत उन पडलं होतं. ४५-५० मिनिटात आम्ही खाली उतरलो. १:३० वाजून गेले होते. कॉलोनिमध्ये येऊन एक बर्फाची पेप्सी प्यायलो ( नेहमीप्रमाणे ) आणि घरी गेलो. तसाच. चेहरा माखलेला पण मन सुखावलेला.

No comments:

Post a Comment