It’s a man’s nature to go out and Climb Mountains, sail the seas and touch the deepest oceans and challenge the nature. By trying to do these things we touch something out side ourselves, and reveal in the illusion that we are the masters of our world. But everyone one of us should never forget that even if we climb the tallest mountains and travel the deepest oceans we are still dwarfed by the nature and its forces.


GUTS AND GLORY

Monday, December 27, 2010

शिवभक्तांची वारी शिवतीर्थावर


काही दिवस अगोदर कळसुबाई व रतनगड करायचा मनसुबा होता. पण काही कारणास्तव तो डाव फिस्कटला. बाहेर चांगल्यापैकी थंडी पडलेली असताना घरी उब खाणं थोडा कठीण जात होतं. अश्या वातावरणात गीरीयारोहाकांना एक निराळच स्फुर्ण चढतं. ते आवरणा फार कठीण. हे सगळा चालू असताना "राजेंद्र सावंत" यांचा "e " लखोटा आला. बेत होता शिवतीर्थ रायगडचा. आता साक्षात महाराजांचं आज्ञापत्र आलं म्हणजे नाही बोलून कसं चालायचं. तर मग बेत आखला काही साह्याप्रेमी जवळ घेतले आणि २४ december ला रात्री १० वाजता घरातून निघालो.
दादरला प्रथम तेज भेटला (ज्याने येण्या अगोदर खूप टांग दिली होती). त्यानंतर मानलीला घरातून घेतलं आणि तिघेहि परेलला पोहोचलो. मयूरला वाडियाजवळ भेटलो. तिथे रायगड संवर्धन प्रतीष्ठांची गाडी तयार होती. राजू दादाला भेटलो आणि गाडीत चढलो. गाडी १२:३० ला निघाली आणि मी लगेच टकमक टोकाची स्वप्ना बघत गुडूप झालो.
पहाटे जाग आली तेव्हा खिडकी बाहेर फक्त धुकं आणि अंधार एवढच दिसत होतं. गाडीत अंधार होता आणि सगळे झोपले होते. ५:३० ला गाडीतून पायउतार झालो ते हिरकणी वाडीत. इथून काही लोक जेवणाचं सामान घेऊन "ropeway" ने गडावर जाणार होते. त्यांना सोडलं आणि आम्ही नानेदरवाज्याच्या वाटेला लागलो. हिरकणी बुरुजाखालून गेलो तेव्हा त्या कड्यावरून ती हिरा गवळण कशी उतरली असेल याचा विचार करूनच अंगावर काटा आला. तिच्या शौर्याला वंदन करून आम्ही पुढे निघालो. डांबरी रस्त्यावरून काही वेळ चालून आड वाटेत शिरलो. वात दाट झाडीतून जात होती. आणखी १५ मिनिटांनी नानेदारवाज्याचे अवशेष दिसू लागले.एक मोठा बुरुज त्या दाट झाडीतून डोकावत होता.आता पहिला टप्पा लांब नाही हे कळले.बघता बघता दरवाजा आमच्यासमोर होता. हा दरवाजा म्हणजे त्याकाळातील गडावर जाण्याचा महामार्ग. टिळकांनी चित्त दरवाजा व पायऱ्या नंतर बांधल्या. या दरवाजाचा इतिहास राजू दादाने सांगितला. संभाजी महाराजांनी इथे कापून काढलेल्या उंटाची गोष्ट ऐकली आणि परत चढायला लागलो. हा रस्ता वापरात नसल्याने फार खराब झाला आहे. आमच्यासारखे काही भट्के सोडले तर या रस्त्याने कोणीएक जात नाही.


"जंगलाची झाडी होती दाट. काढत होतो आम्ही त्या मधून वाट." अशीच वाट काढत काढत जवळ पास ४५ मिनिटं चालून आम्ही मदार मोर्च्यावर पोहोचलो. हा मोर्चा गडाच्या मध्य भागी असल्यामुळे याला "मदार" मोर्चा असे म्हटले जाते. इथेच जन्जीराच्या शिद्दीचादेखील वाडा आहे. त्या काळी तो इथे नमाज पडायचा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथे त्याने एक मशीदही बांधली होती म्हणून. पण त्याचे ना पुरावे मिळतात न अवशेष. त्यामुळे ती फक्त काही लोकांची "creative" कलपना आहे. ही लोक या मुळे या भागाला "मशीद" मोर्चा असेही म्हणतात. पण ही गोष्ट देखील इतिहासकारांनी चुकीची ठरूनदिली आहे. सकाळचं कोवळं ऊन जाऊन आता चांगले चटके लागत होते. जंगलाची वाट सोडून आम्ही पायऱ्या चढत होतो. खालची खोल दरी भयाण वाटत होती. हिवाळ्याची सुरुवात झाल्याने दरीत हिरवळ होती. दूरवर सह्याद्रीची मुख्य रांगेचे कडे उन्हात तलवारीच्या पात्यासारखी तळपत होती. काही फोटो काढून मी पुढे निघालो.



पायवाटेने चालण्यापेक्षा पायऱ्यांनी चढणं फार फार कठीण असतं. मांड्या भरून येतात. हळू हळू वर चढत होतो. या वाटेवर लोकांची वर्दळ खूप असते. रस्त्यातच लिंबू सरबत, पाणी, बोरं आणि अश्याच गोष्टी विकणारी बरीच लोक असतात. हे गावकरी चवथी पाचवीतल्या मुला पासून ऐंशी वर्षांची आजी बाई सुद्धा असुशक्ते. दोन ताक विकणाऱ्या बायका तर पूर्ण वेळ - चढायला सुरुवात केल्या पासून ते गडावर पोहोचे पर्यंत - आमच्या सोबतच होत्या. जवळ पास २ तासांनी उंचावर दोन महाकाय बुरूज दिसायला लागली होती. या बुरुजान्माध्येच दडलेला आहे रायगडाचा महादरवाजा.



महादरवाज्याअगोदर काही १००-२०० पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक होते. सरळसोट असलेल्या पायऱ्या चढून आम्ही त्या महाकाय महादरवाज्यात पोहोचलो. इथे आमच्या सोबत असणारे काही लोकं अगोदर पासूनच बसलेली होती. दरवाज्यात फार कमी लोक होती त्यामुळे काही चांगले फोटो काढता आले. या गडाचा उंबरठा मराठ्यांच्या चारही छत्रपतींनी ओलांडलेला आहे. तर या पावन उंबरठ्याला पाय न लावता आम्ही गडात शिरलो. गडात टाकलेलं पाहिलं पुलाच वेगळा असतं. या गडाचा इथिहास आपल्या समोर उल्गाद्तोय असा वाटू लागते. त्यामध्ये राजू दादाची वर्णनं ऐकून कधी उंबरठा ओलांडणारे महाराज दिसू लागतात तर कधी शिद्द्याची पावले आत पडण्याची दुखद घटना दिसते. अश्याच घटनांना बघत बघत आम्ही गंगासागराकडे पोहोचलो. काही वेळ थांबलो, सावलीत विसावलो आणि होळीच्या माळाच्या दिशेने चालू लागलो. महाराजांना मुजरा केला आणि बाजारपेठेजवळ पोहोचलो.इथे रमा ताईने गरम गरम उपमा दिला. पोटभरून खाल्ला आणि MTDC च्या dormitory च्या दिशेने निघालो. तिथे sack ठेवल्या आणि फक्त camera आणि पाण्याची बाटली घेऊन गाड्फेरीला निघालो.


सर्व प्रथम गडावरच्या पावन कुशावर्त तलावाच्या दिशेने निघालो. वाडेश्वराच्या मंदिरात बसलो. कुशावर्ताचा आणि विक्रम दळवी याच्या तीरांदागीची गोष्ट ऐकली. वाडेश्वराला वंदन केलं आणि वाघ दरवाजा पाहायला कुशावार्ताबाजून निघालो. राजू दादा म्हणाला होतं की इथे एक गोमुख आहे कुठेतरी. ते गेल्या दोन्ही खेपेला पाहिचे राहून गेले होते. यां वेळेस मात्र ते नक्की शोधायचे आणि हा निश्चय करूनच उतरलो. कुशावर्त पाठी राहिला होता पण गोमुख काही दिसेना. परत वर येताना बघू असे म्हणालो आणि वाघ दरवाज्याच्या दिशेने उतरलो. २० मिनिटं उतरून झाल्यावर काश्याचेतरी अवशेष दिसू लागले होते.




पण थोडा पुढे गेल्यावर ते झाडीत लपून दिसेनाशे झाले. याला रायगडाचा चोर दरवाजा का म्हणतात ते व्यवस्तीत काळात होतं आता. झाडातून लपंडाव खेळत एकदाचे पोहोचलो इथे. राजू दादाने इथून राजाराम महाराज कशे पाळले त्याची गोष्ट सांगितली होती. कसा तो वीर उतरला असेल. कारण इथून खाली उतरणे केवळ अशक्यच आहे. इथे न पायर्या आहेत न पायवाट. इथे आहे तर फक्त खोल दरी. सरळ कडा जो उतरतो खोल दरीमध्ये.



इथूनच राजाराम महाराजांना दोरखंडाने खाली उतरवण्यात आलं होतं. आता इथे थंड गार वाऱ्याची झुळूक येत होती. हा वाराच भिंतो रक्तात आणि तयार होतात तानाजी येसाजी सारखे खंदे वीर गडी. इथेच काही वेळ काढला आणि माघारी फिरलो. वर जात होतो कुशावार्ताच्या दिशेने. तेव्हाच लक्ष थोडा उजव्या बाजूला गेलं. आम्हाला हवी असलेली वाट डाव्याहातला होती. इथेच कसले तरी छोटेशे दगड रचल्या सारखे वाटले.जवळ जाऊन बघितला तर इथेच होतं ते गोमुख.




कुशावार्तने स्वतःहून गोमूखाच दर्शन घडवलं होतं आम्हाला.त्याचे photo काढले आणि पुढे जातना ते आमच्यापैकी कोणी शोधले या गोष्टीवरून भांडत भांडत परत वाडेश्वर मंदिरापर्यंत जाऊन पोहोचलो. इथून आलेली वाट न घेता दुसरी उजवी वाट घेतली.या वाटेने जाताना हंबीरराव मोहिते या मातब्बर सेनापतीचा वाडा बघितला. इथेच सावकाराचा वाडा, मोरोपंत पिंगळे तसाच सोनोपंत डबीर यांचे वाडे आहेत. एवढे वाडे जवळपास असल्याकारणाने या मंदिराला वाडेश्वर असे नाव ठेवण्यात आले आहे.
ऊन चटके देत होतं. परत वर बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचलो. जवळच्या एका गाव्काराच्या घरी आमची जेवणाची सोय केली होती. तिथे जाऊन जेवण वगैरे आटपून पुन्हा गडफेरी आरंभली. आता टकमक टोकाच्या दिशेने निघालो. वाटेत लिंबू सरबत प्यायलो.टकमकला जाण्याआधी २ दारू कोठारं बघितली. टकमकवर काही लोक rappeling करत होते. त्यामुळे इथे एक वेगळाच गोंधळ चालू होता. त्यामुळे त्यांना जास्त त्रास न देता आम्ही २-३ फोटो काढून माघारी फिरलो. आता पोहोचलो कोळीम तलावाकडे. हा गडावरचा एक मोठा तलाव आहे. कोळीमच्या काठावर बसून छत्री निजामपुरची गोष्ट ऐकली. साडे पाच वाजले होते.आता जाग्देश्वराच्या दिशेने निघालो. तिथे काही शाळकरी मुलांची सहल आली होती.




त्या गोंधळात काही फोटो काढले आणि मनोमन जाग्देश्वाराला वंदन करून महाराजंच्या समाधी पाशी गेलो.महाराजांच्या पद्स्प्रशाने पावन झालेली पायरी उतरलो आणि चिरनिद्रेत निजलेल्या महाराजांपाशी नतमस्तक झालो.




हिरोजी इंदुल्कारांच्या नावाची पायरी बघितली व तिथलाच शिलालेख ही वाचला. पुढे वाघ्याची समाधी पहिली. समोर असलेलं भवानी टोक साद घालत होता.गेल्या दोन वेळी इतवार येऊन परत फिरव लागलं होत. या वेळेस भवानी टोक बघायचच असं ठरवलं आणि सांगितल तसा राजू दादाला. तो म्हणाला अगोदर बारा टाकी पाहू मग जाऊ भवानी टोकाला. तसेच भराभर बारा टाकी पर्यंत पोहोचलो. या भागात देखील मी अगोदर कधी आलो नव्हतो. इथून दरी थोडी जासतच खोल वाटत होती. दरी मध्ये पूर्ण हिरवळ होती. जवळच एक दारू कोठार होत. या इथे बरीच पाण्याची टाकी आहेत. काही छोटी तर काही मोठी. बारा आहेत की नाही ते मोजले नाहीत. पण असतीलही.
सूर्य मावळतीला झुकत होता आणि नाही म्हटला तरी भवानी टोक कमीत कमी २ किलोमीटर तरी नक्कीच असेल. पण आता नाही गेलो तर अजून बरेच दिवस थांबव लागेल हे ठाऊक होत. त्यामुळे भिडलो त्या दिशेला.वाट सुक्या गवतातून होती. इथवर फार कमी लोक येतात. त्यामुळे इथे पायवाट नाही आहे. आहेत तर फक्त ढोरवाटा. ही वाट काढत काढत कधी कधी तर धावत पळत पोहोचलो एकदाचे त्या टोकाला. आता इथे थोडावेळ बसून परत फिरायचं असं ठरवलं. इतक्यात एक गावकरी लांबून शीळ वाजवत चालला होता. आम्ही त्या शिळेला साद दिली आणि त्याने विचारला " पाहुन , भवानी मंदिरात यता काय ? " मी कोणाकडे न बघता त्याच्या पाठी निघालो. जर दुसर्यांना विचारल असत तर कोणी तयार नसतं झालं. मी पुढे गेल्यावर त्यांना पाठून येण भाग होतं.आता तर खाली उतरायच होतं. बराच वेळ खाली उतरत उतरत गेलो. जवळ पास १५ मिनिटांनी एका छोट्याश्या दगडाच्या खोबणीत ते मंदिर होतं. तिथे नतमस्तक होऊन इथवर यायची सोय केल्या बद्दल आभार मानले व माघारी फिरलो. आता लक्ष्य होतं ते जगदेश्वर मंदिराच आणि ते सुद्धा सूर्यास्त होण्या अगोदर.
वर येणारी वाट एकदम निमुळती होती. एका वेळेस एकच व्यक्ती चालू शकेल अशी ती वाट आहे. तिथून थोड जपून वर आलो आणि नंतर सुटलो जाग्देश्वराच्या दिशेने. डाव्या हाताला सूर्य मावळत होता.भगवा रंग आकाशात चाहु बाजूने पसरला.


दूरवर नागर्खान्याची आकृती त्या भगव्या रंगात दिसत होती. तो भगवा रंग जणू मराठ्यांचा आपला भगवा असल्यासारखा भासत होता. त्या रंगाच्या पार्श्वभूमीत जाग्देश्वाराचा फोटो काढला आणि धावत सुटलो परत. कसे-बसे पोहोचलो जगदेश्वर पर्यंत. तिथून आणखी १५ मिनिटात पोहोचलो आमच्या वसतिगृहाकडे.
हात पाय धुतले आणि थोडा आराम केला. कपडे बदलले आणि चक्क आम्ही पत्ते खेळत बसलो. त्या नंतर थोड्यावेळाने आमचं जेवण आलं. पिठलं भाकरी खाऊन बाहेर अंगणात गेलो. मस्तपैकी चांदण्या चमकत होत्या आकाशात. त्या चांदण्यात गप्पा मारत बसलो. काही वेळाने मला झोप अनावर झाली आणि मी परत जाऊन माझ्या थकलेल्या शरीराला हवा असलेला आराम दिला.
सकाळी ५ वाजता उठलो ते कुठल्याश्या पोवाड्याच्या सुरांनी. उठल्या उठल्या मयूरला उठवल. सर्व प्रातःकालीन विधी पूर्ण केल्या आणि होळीच्या मालावर जायला निघालो. वाड्य्तातून बाहेर पडलो आणि होळीच्या माळावर जाऊन पोहोचलो. महाराजांना सुप्रभात बोलून फोटो काढले आणि परत मेघ्दाम्बारीच्या दिशेने निघालो. सिंहासनाकडे सगळे हजर होते.शिवाप्रर्थाना आटपून आम्ही वाडा पाहायला निघालो. राजू दादा प्रत्येक जागा व त्याच महत्व समजाऊन सांगत होता. मनोरे पहिले, अष्टप्रधान मंडळाचे कार्यालय पहिले, टाकसाळ, राणीवसा आणि अशे बरेच वास्तूंचे अवशेष पाहून बाजारपेठेत पोहोचलो. परत त्या गावकरच्या घरी जेऊन गड उतरू लागलो. वेळ कमी असल्याकारणाने आम्ही नानेदारवाज्याने न जाता पायरया उतरून गेलो.




महादरवाज्याला परत यायचे वचन देऊन बाहेर पडलो. नन्तर परतीच्या वाटेने जाताना पाचाडला जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला.तर अशी माझी रायगड वारी समाप्त झाली. गेल्या ३ वर्षात हि माझी ३री वेळ रायगडला यायची. हा गड आपलासा करून सोडतो. परत पावलं या दिशेने वळल्यावाचून राहत नाहीत.

1 comment:

  1. mitraa at last tu te kelas jyachi me wat baghat hoto...marathitun blog lihlasch shevati...!!!dhanyawad..!!

    ReplyDelete